भू रुपांतराच्या मुद्द्यावरून काही नागरिकांनी पणजीतील चर्च चौकात निदर्शने करत विश्वजीत राणे यांना नगरनियोजन मंत्रिपदावरून हटवावे, अशी मागणी केली होती. त्यावर नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी भाष्य केले. आपण एक मोठा नेता असल्याने आपणाला लक्ष्य केले जात आहे. कलम 39 (अ) आणि 17 (2) ही रद्द केली जाणार नाहीत, असे स्पष्ट करतानाच, यापूर्वी जी भू रुपांतरे झाली त्यांचे काय होईल यासंबंधी काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.
या भू रुपांतराचा कोणत्या विरोधी आमदारांना फायदा मिळाला, ते सांगावे, असे जाहीर आव्हान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जे दिले आहे, त्याविषयी आपण विधानसभेत बोलणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.