विदेशी देणगी प्रकरण
बेकायदेशीर विदेशी देणग्यांप्रकरणी आम आदमी पार्टीच्या हिशोबाच्या वह्या केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत तपासण्यात येणार आहेत.
एका जनहित याचिकेला अनुसरून दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निकालानंतर गृहमंत्रालयाने ‘आप’कडून विदेशी देणग्यांबाबात विचारणा केली होती. त्याबाबत पक्षाने दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याने पक्षाची हिशोबाची पुस्तके तपासणार असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, आपण कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे ‘आप’ने म्हटले आहे. केवळ विदेशातील भारतीयांकडून देणगी घेतल्याने पक्षाकडून सांगण्यात आले. पक्षाने ८ नोव्हेंबरपर्यंत १९ कोटी देणगी जमवली होती. या देणग्या ६३ हजार लोकांकडून आल्या असून त्यात अनिवासी भारतीयांचाही समावेश आहे, असे सांगण्यात आले.
दिल्ली विधानसभेत २७ जागा मिळविणार्या ‘आप’चे अरविंद केजरीवाल शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.