आम आदमी पक्षाचे सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घटना ताजी असतानाच आता पक्षाचे निमंत्रक एल्विस गोम्स यांनीही शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रदीप पाडगावकर यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देताना आरोग्याच्या कारणावरून आपण पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. तर एल्विस गोम्स यांनी पक्षासाठी तळागाळापर्यंत जाऊन आपणाला काम करायचे असल्याने आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. काल पत्रकार परिषदेत ही माहिती देताना आपल्या जागी आता राहूल महांबरे हे निमंत्रक म्हणून जबाबदारी सांभाळणार असल्याचे गोम्स यांनी स्पष्ट केले.