आनंदने कार्लसनला रोखल

0
91

पाचवेळच्या विश्‍वविजेत्या विश्‍वनाथन आनंद याने विद्यमान विश्‍वविजेत्या मॅग्नस कार्लसन याला काल बरोबरीत रोखले. अल्टिबॉक्स नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील पाचव्या फेरीतील या डावात ४५ चालींनंतर उभयतांनी गुण विभागून घेण्यास संमती दर्शवली.

चीनचा स्टार खेळाडू डिंग लिरेन याने कमरेच्या शस्त्रक्रियेमुळे स्पर्धा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर लिरेन स्पर्धा पुढे खेळणे अपेक्षित होते. परंतु, विश्रांतीच्या कारणास्तव त्याने अंग काढून घेतले. यामुळे डिंग याच्याविरुद्ध मिळविलेले निकाल अवैध ठरविण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. डिंगविरुद्धचा सामना बरोबरीत सोडविलेल्या आनंदला यामुळे अर्धा गुण गमवावा लागला व यामुळे त्याची संयुक्त चौथ्या स्थानी घसरण झाली. सहाव्या फेरीत आनंदचा सामना मेमेदेरोव याच्याशी होणार आहे.

पाचव्या फेरीचे निकालः मॅग्नस कार्लसन (३.५/५) बरोबरी वि. विश्‍वनाथन आनंद (२/४), फाबियानो कारुआना (२/४) वि. वि. सर्जेई कर्जाकिन (२.५/५), शाखरियार मेमेदेरोव (१.५/५) वि. वि. हिकारू नाकामुरा (२/४), मॅक्सिम वाचिएर लाग्रेव (१.५/४) बरोबरी वि. लेवोन अरोनियन (२.५/५)