‘आधार’ केवायसीद्वारे दिलेले मोबाइल क्रमांक चालूच राहणार

0
105

नवी दिल्ली
आधार केवायसीद्वारे ग्राहकांना देण्यात आलेले मोबाइल क्रमांक बंद होणार नसल्याचे केंद्र सरकारने काल स्पष्ट केले. दूरसंचार विभाग आणि यूआयडीएआयने काल संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात वरील स्पष्टीकरण दिले आहे. या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी सीमकार्डधारकांना दिलासा मिळाला आहे.
आधार कार्डच्या आधारे देण्यात आलेले भारतातील ५० कोटी मोबाइल फोन बंद होणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. सदर वृत्तामुळे मोबाइल कार्डधारक संभ्रमात पडले होते. सर्वोच्च न्यायालयाने आधारसंबंधी दिलेल्या आदेशात आधार केवायसीद्वारे देण्यात आलेले मोबाइल क्रमांक बंद करावेत असे आदेशात कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे लोकांनी अकारण घाबरून जाण्याचे कारण नाही. लोकांनी अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे असे दूरसंचार विभाग आणि यूआयडीएआयने संयुक्त निवेदनात स्पष्ट केले आहे.