संसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत गोव्यातील खासदारांनी तीन गावांची निवड केली आहे. राशोल, खोला आणि इब्राहमपूर असे हे तीन गाव आहेत.
या गावांचा २०१६ सालापर्यंत विकास करण्यात येणार आहे. या गावांमध्ये ग्रामसमित्या स्थापण्यात येणार असून त्या सविस्तर आराखडा सादर करतील. अनुसूचित जाती जमातींचे प्राबल्य असलेले गाव निवडून, त्यांचा सरकारी योजना व खासदार निधीद्वारे विकास करण्यासाठी ही योजना तयार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केलेली ही योजना असून केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत त्याचे नियंत्रण होईल.