इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढत असून, इराणने गेल्या आठवड्यात त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्र हल्ला चढवला होता. इराणने इस्रायलवर 300 हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्र डागली होती. आता इराणच्या या हल्ल्याला इस्रायलने प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलने शुक्रवारी सकाळी इराणमधील अनेक शहरांवर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ला केला. इराणच्या फार्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इराणच्या इसाफहान शहरातील विमानतळावर स्फोट झाले. याच इसाफहान प्रांतात इराणच्या न्यूक्लीअर साईट्स आहेत.