आणखी 7 विमानांना बॉम्बची धमकी; छत्तीसगढमधून एक अल्पवयीन ताब्यात

0
12

भारतीय विमानसेवा कंपन्यांच्या आणखी 7 विमानांना बुधवारी बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. त्यामध्ये इंडिगोच्या 4, स्पाइसजेटच्या 2 आणि अकासाच्या एका फ्लाइटचा समावेश आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी बुधवारी छत्तीसगडमधील एका अल्पवयीन मुलाला तीन विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी ताब्यात घेतले.

गेल्या 3 दिवसांत 17 विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. 15 ऑक्टोबर रोजी देखील 7 फ्लाइट्सवर बॉम्बच्या धमक्या आल्या होत्या. दिल्ली ते शिकागो या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचाही या उड्डाणांमध्ये समावेश होता. त्यानंतर ते कॅनडाला वळवण्यात आले आणि इक्लुइट विमानतळावर उतरवण्यात आले होते. तपासादरम्यान या विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. त्याआधी 14 ऑक्टोबरला तीन विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती.