आणखी 30 विमानांना बॉम्बची धमकी

0
5

>> 8 दिवसांत 120 विमानांना धमकी

>> काल वेगवेगळ्या ठिकाणच्या 5 शाळांनाही धमकी

सोमवारी रात्री उशिरा 30 विमानांना पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे समाविष्ट आहेत. गेल्या 8 दिवसात 120 हून अधिक विमानांना बॉम्ब हल्ल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

इंडिगोच्या चार विमानांना सोमवारी धमकी मिळाली. त्यात मंगळुरू-मुंबई, अहमदाबाद-जेद्दाह (2) आणि लखनऊ-पुणे यांचा समावेश आहे.
गेल्या आठवडाभरात बॉम्बच्या धमक्या मिळाल्यानंतर अनेक विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

कठोर कायदा आणण्याची तयारी
नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी सोमवारी, धमक्या खोट्या असल्या तरी आम्ही त्या हलक्यात घेऊ शकत नाही. याविरोधात कडक कायदा आणणार असल्याचे सांगितले आहे. अशा धमक्या देणाऱ्यांची नावे ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात, असे मंत्री नायडू यांनी सोमवारी सांगितले. सरकार विमान वाहतूक सुरक्षा नियम आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा कायदा, 1982 विरुद्ध बेकायदेशीर कायद्यांचे दडपण सुधारण्याची योजना करत असल्याचे त्यांनी सांगितले.

धमक्यांबाबत कारवाई
विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची किंवा विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यााबाबत केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. 16 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने उड्डाणांमध्ये एअर मार्शलची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवशी गृहमंत्रालयाने बनावट धमक्यांबाबत विमान वाहतूक मंत्रालयाकडून अहवाल मागवला आहे. सीआयएसएफ, एनआयए आणि आयबीलाही अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
तसेच एअरलाइन्सच्या सीईओंची 19 ऑक्टोबर रोजी बैठक घेतली. याशिवाय प्रवाशांची गैरसोय आणि विमान कंपन्यांचे नुकसान यावरही चर्चा झाली.
19 ऑक्टोबर रोजी केंद्राने डीजीसीए प्रमुख विक्रम देव दत्त यांना पदावरून हटवले आणि त्यांना कोळसा मंत्रालयात सचिव केले. तसेच या धमकीप्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली. याशिवाय छत्तीसगडच्या राजनांदगाव येथून एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.

धमक्यांमुळे 200 कोटींचे नुकसान
विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच विमान त्याच्या नियोजित विमानतळाऐवजी जवळच्या विमानतळावर उतरवण्यात आले. यामुळे इंधनाचा वापर जास्त होतो, विमानाची पुन्हा तपासणी करावी लागते, प्रवाशांची सोय अशा विविध व्यवस्था कराव्या लागतात. गेल्याकाही दिवसांत आलेल्या धमक्यांमुळे वरील व्यवस्था करून आतापर्यंत 200 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

पाच शाळांना धमकी
केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) दिल्लीतील 2 आणि हैदराबादमधील 1 शाळेला बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. या धमक्या व्यवस्थापनाला ईमेलद्वारे पाठवण्यात आल्या. याशिवाय तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील चिन्नवेदमपट्टी आणि सर्वनमपट्टी या दोन खासगी शाळांनाही बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. मंगळवारी सकाळी बॉम्बशोधक पथक या सर्व शाळांमध्ये पोहोचले. शाळा रिकामी करून तपास केला जात आहे. मात्र, अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही.

यापूर्वी 20 ऑक्टोबरला दिल्लीतील रोहिणी येथील सीआरपीएफ शाळेत स्फोट झाला होता. मात्र, या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. फक्त दुकाने आणि शाळेच्या भिंतीचे नुकसान झाले.

120 विमानांना धमकी
15 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत 120 हून अधिक विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली. यामुळे 200 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. उड्डाणे धोक्यात आल्याने अवघ्या एका आठवड्यात 200 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. 21 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा 30 विमानांना बॉम्बची धमकी मिळाली.