अन्न आणि औषध प्रशासनाने भेसळयुक्त फरसाण, मिठाई व अन्य खाद्यपदार्थांची विक्री करणार्या आस्थापनांवर छापे टाकण्याचे सत्र चालूच ठेवले असून काल प्रशासनाने फोंडा व आजूबाजूच्या चार आस्थापनांवर छापा टाकून फरसाण चक्री, मिठाई मिळून सुमारे एक लाख रु. किमतीचे पदार्थ जप्त करून ते नष्ट केले, अशी माहिती संचालक सलीम वेलजी यांनी दिली.
छापा टाकण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये जेसी नगर, फोंडा येथील पुरुषोत्तम वैष्णव, कवळे येथील जोगराम राठोड, संतोष स्वीट मार्ट, वरचाबाजार-फोंडा व बोंडबाग-फोंडा येथील धनराज वैष्णव यांच्या दुकानांचा समावेश आहे.