पाकिस्तानमधील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी कमांडरपैकी एक शेख मील उर रेहमान, खैबर पख्तूनख्वामधील अबोटाबाद येथे रहस्यमय परिस्थितीत मृत आढळून आला. रहमान युनायटेड जिहाद कौन्सिलचा सरचिटणीस आणि तहरीक-उल-मुजाहिदीनचाअमीर होता. तो काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी होता. ऑक्टोबर 2022 मध्ये गृह मंत्रालयाने त्याला दहशतवादी घोषित केले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तो जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील होता आणि त्याने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसोबतही काम केले होते. अलीकडच्या काही महिन्यांत, पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत किंवा गूढ परिस्थितीत मृत सापडले आहेत.
पाकिस्तान स