वेदश्री परब हिने चार वर्षांच्या मुलीसह जुवारी नदीत आत्महत्त्या करण्याचे प्रकार ताजे असताना काल दुपारी लोटली येथील विवाहित महिलेने दोन मुलांसह बोरी पुलाजवळ जुवारी नदीत आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण सुदैवाने तेथे असलेल्या लोकांनी उडी मारण्याच्या तयारीत असताना तिला अडविले व मायणा कुडतरी पोलिसांना खबर दिली.
पतीशी झालेल्या वादातून तिची मनस्थिती ठिक नव्हती. त्यातून काल ८ वर्षे व १० वर्षांच्या मुलासहीत तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी उशिरा तिची जबानी घेण्याचे काम चालू होते.