इस्लाम राष्ट्र वादी आयएसआयएस बंडखोरांनी आणखी एका अमेरिकी पत्रकाराचा शिरच्छेद केल्याची पुष्टी काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली. बंडखोरांनी जारी केलेली चित्रफित खरी असल्याचे राष्ट्राध्यक्षांनी सांगितले. दरम्यान, या हत्येबाबत योग्य तो न्याय केला जाणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या महिन्यात अशाच प्रकारे एका पत्रकाराचा शिरच्छेद करण्यात आला होता.
इराकमधील हवाई हल्ल्याद्वारे हत्यांना अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जबाबदार असल्याचा आयएसआयएस दहशतवाद्यांचा आरोप आहे.