आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी यूपीतील विकास दुबेला अटक

0
149

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी विकास दुबे याला अखेर काल पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अटक केली. दि. २ जुलै रोजी कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर विकास दुबे आणि त्याच्या सहकार्‍यांनी अंदाधुंद गोळीबार करत आठ पोलिसांची हत्त्या केली होती. तेव्हापासून विकास दुबे हा फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याच्यावर पाच लाखांचे बक्षिसही जाहीर केले होते. अखेर त्याला मध्य प्रदेशातून पोलिसांनी अटक केली.

दरम्यान, याआधी पोलिसांनी विकास दुबेच्या तीन सहकार्‍यांना चकमकीत ठार केले आहे. विकास दुबे याच्यावर हत्या, अपहरण, खंडणी, दंगल भडकवणे असे ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.