आठ दिवसांत २०० कोटींचे सरकारी रोखे विक्रीस

0
147

राज्य सरकारने १७ ऑक्टोबर २०१९ रोजी १०० कोटींचे सरकारी रोखे विक्रीसाठी काढले आहेत. १५ ऑक्टोबरला १०० कोटींचे सरकारी रोखे विक्रीस काढण्यात आले आहेत. मागील आठ दिवसात एकूण २०० कोटींचे सरकारी रोखे विक्रीसाठी काढण्यात आले आहेत.

राज्यातील खाण व्यवसाय बंदी व इतर काही कारणामुळे सरकारी महसुलाचे प्रमाण घटल्याने राज्य सरकारला आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. राज्य सरकारचे कर्ज १७ हजार कोटींच्यावर पोहोचले आहे. गेल्या १५ ऑक्टोबरला १०० कोटींच्या सरकारी रोख्यांची विक्री करण्यात आली आहे. येत्या २२ ऑक्टोबर २०१९ रोजी आणखी १०० कोटी रुपयांच्या सरकारी रोख्यांची विक्री लिलावात केली जाणार आहे. वित्त सचिव पुनीत कुमार गोयल यांनी १०० कोटींच्या सरकारी रोख्यांच्या विक्रीची सूचना जारी केली आहे. राज्य सरकारकडून भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे १०० कोटींच्या दहा वर्षे कालावधीचे गोवा राज्य सरकारी रोख्यांची विक्री केली जाणार आहे. स्पर्धात्मक बोली इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आरबीआय कोअर बँकिंग सोल्यूशन पद्धतीने २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वा. सादर केल्या पाहिजेत.