आठवीतल्या विद्यार्थ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
82

दिल्लीजवळील फरिदाबाद येथील एका शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याने स्वतःला काल जाळून घेतले. होली चाईल्ड स्कूल या शाळेतील शिक्षकाने आपल्याला वाईट वागणूक दिल्याने आपण तसे केल्याचे त्याने सांगितले. सदर विद्यार्थी पंचेचाळीस टक्के भाजला असून उपचार सुरू आहेत.