आज अर्थसंकल्प

0
198

>> १६ एप्रिलपर्यंत अधिवेशन

गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज दि. २४ मार्चपासून सुरू होत असून ते १६ एप्रिलपर्यंत चालू राहणार आहे. आज पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडणार आहेत.

अधिवेशनाविषयी दै. नवप्रभाला माहिती देताना विधानसभा सचिव नम्रता उलमन म्हणाल्या की, अधिवेशनात ५६८ तारांकित तर १०७१ अतारांकित प्रश्‍न विविध आमदारांकडून मांडण्यात येणार आहेत. त्याशिवाय विविध आमदारांनी १५ खासगी विधेयके मांडलेली असून त्यात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मांडलेल्यात आलेल्या लोकायुक्त विधेयकाचाही समावेश आहे.

अर्थसंकल्पावर चर्चेसाठीही आवश्यक तेवढ्या वेळ देण्यात आला असल्याची माहितीही उलमन यांनी काल दिली.
दरम्यान, लवकरच होणार असलेल्या ५ नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दिवस कमी करण्यात यावेत अशी मागणी विरोधकानी केलेली आहे. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिवेशनाचे दिवस कमी करण्याची मागणी योग्य नसल्याचे सांगून दिवस कमी केले जाण्याची शक्यता नाकारली आहे.

कोविडमुळे पत्रकार सोडल्यास अन्य कुणालाही अधिवेशन पाहण्यासाठी हजर राहात येणार नाही.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज दुपारी २.३० वा . २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडणार आहेत. आज सकाळी ११.३० वा. अधिवेशनाला सुरवात होणार असून सकाळच्या सत्रात प्रश्‍नोत्तराचा तास होणार आहे.