आजही जोरदार पाऊस शक्य

0
7

गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 4.61 इंच पावसाची नोंद झाली असून, राज्यात पावसाचा जोर कायम आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 96.97 इंच पावसाची नोंद झाली असून, मोसमी पावसाची इंचाच्या शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. हवामान विभागाने शनिवार दि. 20 जुलैसाठी देखील रेड अलर्ट जारी केला आहे.
सध्याच्या घडीला पावसाचे प्रमाण 56.9 टक्के जास्त आहे. मागील चोवीस तासांत वाळपई, साखळी, फोंडा, मडगाव, मुरगाव, सांगे आदी भागात जोरदार पावसाची नोंद झाली. चोवीस तासांत वाळपई येथे सर्वाधिक 5.80 इंच पावसाची नोंद झाली.

राज्यातील वाळपई, सांगे, काणकोण, फोंडा आणि साखळी या पाच भागांनी पावसाच्या इंचाचे शतक ओलांडले आहे. वाळपई येथे आत्तापर्यंत 112.46 इंच, सांगे येथे 109.19 इंच, साखळी येथे 105.59 इंच, फोंडा येथे 103.53 इंच, काणकोण येथे 100.18 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील इतर भागांतही पावसाचे प्रमाण चांगले आहे. चोवीस तासांत झाडांच्या पडझडीच्या आणखी 97 घटनांची नोंद झाली. या झाडांच्या पडझडीमुळे सुमारे 6 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.