आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन

0
15

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसमधील आमदारांचा एक गट ङ्गुटून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर आजपासून राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. राज्यात होऊ घातलेल्या पंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर या अधिवेशनाचे दिवस आता कमी करण्यात आले असून आता हे अधिवेशन केवळ १० दिवस म्हणजेच येत्या २२ तारखेपर्यंत चालणार आहे. हे अधिवेशन एकूण २५ दिवस घ्यायचे ठरले होते.

पण पंचायत निवडणुका लक्षात घेऊन नंतर कामकाज सल्लागार समितीने हे अधिवेशन १० दिवसांचे करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अधिवेशनाचे दिवस कमी करण्यास विरोधी कॉंग्रेस पक्षासह आम आदमी पार्टी, रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी तसेच गोवा ङ्गॉरवर्ड आदी पक्षांनी विरोध दर्शविलेला आहे. विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी हे अधिवेशन पूर्वी ठरल्याप्रमाणे २५ दिवस व्हायला हवे, असे मत व्यक्त केले होते. त्याचबरोबर गोवा ङ्गॉरवर्ड पार्टीचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांनीही पावसाळी अधिवेशन २५ दिवसांचे हवे असल्याचे मत व्यक्त केले होते. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब तसेच या पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनीही पावसाळी अधिवेशन २५ दिवसांचे हवे अशीच भूमिका घेतली होती.