>> सकाळी १० ऐवजी ९ वाजता सुरू होणार
>> रिझर्व बँक ऑफ इंडियाचा आदेश
रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिलेल्या एका आदेशानुसार आज सोमवार दि. १८ एपलिपासून बँकांच्या वेळेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आरबीआयने आजपासून बँका एक तास अदगोदर उघडण्यात येणार आहेत. यामुळे ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. यापुढे बँका ९ वाजता उघडणार आहेत. कोरोना महामारीमुळे रिझर्व बँकेने उघडण्याची ही वेळ कमी केली होती. आता पुन्हा ही वेळ नियमित केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी सोय होणार आहे.
दरम्यान, आरबीआयद्वारे संचलित मार्केटच्या ट्रेडिंगच्या वेळांमध्येही बदल करणअयात आला आहे. यामध्ये कॉल मनी, गव्हर्मेंट पेपर्स, गव्हवर्मेंट सिक्योरिटीज, रेपो इन कॉर्पोरेट बॉन्ड्स व रूपी इंटरस्ट रेट डेरिवेटिव या बाजारांचा समावेश आहे. याशिवाय अन्य बाजारदेखील आज दि. १८ एप्रिलपासून सकाळी १० ऐवजी सकाळी ९ वाजता उघडणार आहेत. आरबीआयने सर्व बँकांना कार्डलेस एटीएम व्यवहाराची सुविधा लवकरच सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्राहकांना लवकरच यूपीआयद्वारे बँक आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे.
कार्डलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. कार्डलेस कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये एटीएम पिनऐवजी मोबाइल पिन वापरला जाणार आहे. या बदलामुळे एटीएमद्वारे होणारी ङ्गसवणूक रोखण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच कार्डलेस ट्रान्झॅक्शनमुळे व्यवहार सोपे होतील आणि कार्डलेस ट्रान्झॅक्शनमुळे कार्ड क्लोनिंग, कार्ड चोरी आणि इतर अनेक प्रकारची ङ्गसवणूक टाळता येईल. एसबीआयसारख्या काही बँका आधीपासूनच अशाप्रकारची सेवा देत असल्याचे यावेळी तज्ज्ञांनी सांगितले.