आजपासून देशात कोरोना लसीकरण

0
235

>> गोव्यात ७०० जणांना लस

आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
कोरोनायोद्ध्यांना प्रथम लस देण्यात येणार असून त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे संवादही साधणार आहेत.

देशपातळीवरील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ दिनी १६ जानेवारीला राज्यातील सात केंद्रातून ७०० आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस दिली जाणार आहे.
राज्यात कोरोना प्रतिबंधक लस मोहिमेसाठी सुरुवातीला आठ इस्पितळे निश्‍चित करण्यात आली होती. तथापि, कोरोना लसीकरणासाठी केवळ ७ केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर १०० जणांना लस दिली जाणार आहे.

काल एकाचा मृत्यू
राज्यात चोवीस तासांत आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असून नवीन ८० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना बळींची संख्या ७५३ झाली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५२,२६२ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ८६६ एवढी आहे.