आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षाची आघाडीची नितांत गरज आहे. काँग्रेस पक्षाला आघाडी नको आहे; मात्र गोव्यातील लोकांना 2027 च्या निवडणुकीसाठी आघाडी झालेली हवी आहे. आघाडी केल्याशिवाय विजय मिळवणे अशक्य आहे, असे मत आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुखालतीत व्यक्त केले. आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार नाही. त्यांनी उमेदवारी तरी सुध्दा काँग्रेस पक्षात प्रवेश करणार नाही. आपण आम आदमी पक्षाचे कार्य करीत राहणार आहे, असेही व्हिएगस यांनी स्पष्ट केले. आपण राजकारणामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आलो आहे. आमदारकीच्या काळात करणाऱ्या कार्याची नोंद इतिहासात राहील. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. सध्याच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.