आग दुर्घटनांत २ लाखांची हानी

0
74

मधलावाडा, साळ येथील आदिनाथ परब यांच्या मालकीच्या गवताच्या गंजीला आग लागून १ लाखाचे नुकसान झाले तर दुसर्‍या एका दुर्घटनेत सोनशी येथे देविदास आगरवाडेकर यांच्या गोदामाला आग लागून १ लाखाची हानी झाली. सोनशी येथील काशिनाथ बर्वे यांच्या मालकीच्या घरातील एका खोलीत आगरवाडेकर यांनी टायर्स, ट्यूब व इतर ठेवलेले सामान जळून खाक झाले. डिचोली अग्निशामक दलाचे जवान रोहिदास परब, नास्नोडकर, जयंत कानोळकर, दत्ता सिनारी, महादेव गावस व अधिकारी अच्युत धावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आग आटोक्यात आणल्याने दोन लाखांची मालमत्ता वाचली.