आगोंद येथे ट्रॉलर बुडाला; २८ खलाशांना वाचवले

0
88

काल सकाळी आगोंदा परिसरातील अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेला लिबिया ट्रॉलर बुडाला. मात्र त्यालगत असंख्य इतर ट्रॉलर्सनी बुडणार्‍या ट्रॉलरवरील २८ खलाशांना सुखरूप किनार्‍यावर आणले.काल पहाटे मासेमारीसाठी कुटबण येथून लिबिया बोट गेली होती.
खोल समुद्रात वास्को येथील बिस्मिल्ला बोटीची धडक लिबियाला बसली व मागच्या भागाचे नुकसान झाले. बोटीत पाणी भरून ती बुडायला लागली. तात्काळ इतर दोन बोटी व नावात बुडणार्‍या २८ कामगारांना घेऊन किनार्‍यावर आणून सोडले. बुडालेल्या बोटीचा शोध चालू आहे.