आगामी अर्थसंकल्प लोकहितार्थ : मुख्यमंत्री

0
14

राज्याचा आगामी वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प लोकहितार्थ असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. सरकारच्या विविध खात्यांचे सचिव आणि विभाग प्रमुखांसोबत अर्थसंकल्पाच्या विषयावर घेतलेल्या एका बैठकीनंतर ते बोलत होते.
या बैठकीत राज्यात केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. आगामी विधानसभा अधिवेशनात पूर्वीच्या अर्थसंकल्पातील योजनांच्या व विकासकामाच्या कार्यवाहीबाबत अहवाल सादर केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येत्या 2 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.