आगरवाडा पंचायत मंडळ, व्हिलेज डेव्हलपमेंट समिती, नागरिक, व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने आज सोमवार रविवार दि. २१ पर्यंत आगरवाडा-चोपडे पंचायतक्षेत्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पेडणे पोलिसांच्या आणि सरकारी यंत्रणेच्या दबावाखाली हेलॉकडाऊन मागे घेण्यात आले आहे. आगरवाडा सरपंच प्रमोद गावकर यांनी याबाबत काल दि. १४ रोजी पंचायत मंडळाची तातडीची बैठक घेत लॉकडाऊन मागे घेतल्याचे नमूद केले.
सरपंच श्री. गावकर यांना पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दि. १३ रोजी रात्री साडेअकरा फोनद्वारे चर्चा करून तुम्हाला लॉकडाऊन करता येणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन मागे घ्यावा अशी सूचना केली. त्यानुसार हा लॉकडाऊन मागे घेण्यात आला.