आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी 27 वर्षीय तरुण ताब्यात

0
25

काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर इस्लामविरोधी आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. त्या प्रकरणी मडगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणी काल सायबर क्राईम विभागाने एका 27 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. चौकशीनंतर त्याला मडगाव पोलिसांकडे सुपूर्द केले जाणार असून, नंतर त्याला रितसर अटक केली जाणार आहे, अशी माहिती सायबर क्राईम विभागाचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.