मठग्रामस्थ हिंदू सभेच्या श्री दामोदर विद्यालय इंग्लिश हायस्कूल आयोजित अनंत (बाबू) नायक स्मृतिप्रित्यर्थ सासष्टी तालुका आमंत्रित आंतरविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत आकेंच्या टी.बी. कुन्हा हायस्कूलने विजेतेपद प्राप्त झाले व त्यांनी अनंत नरसिंह (बाबू) नायक चषक व रोख रक्कम ५००० बक्षीस पटकावले. अंतिम सामना टी.बी.कुन्हा व शांतीनगर येथील शिशुविकास हायस्कूलमध्ये झाला. सुरवातीपासून टी.बी.कुन्हाने आक्रमक पवित्रा घेतला. टी.बी. कुन्हाने ३७ गुण तर शिशुविकासने २९ गुण पटकावले. उपविजेत्या संघाला रोख रक्कम ३००० तसेच प्रशस्तिपत्रे देण्यात आली. विकास विश्वकर्माला उत्कृष्ट खेळाडू म्हणून रोख बक्षीस देण्यात आले.
या स्पर्धेत श्री दामोदर विद्यालय हायस्कूल, टी.बी. कुन्हा आकें, आदर्श वनिता विद्यालय हायस्कूल मडगाव, न्यू ईरा हायस्कूल मडगाव, शिशुकुंज विनायक शेणवी हायस्कूल रावणफोंड, ए.आय.एम इंग्लिश हायस्कूल दवर्ली, कुंकळ्ळी युनायटेड हायस्कूल यांनी भाग घेतला. बक्षीस वितरणाला क्रीडा खात्याचे तालुका अधिकारी मंथन आडपईकर प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी खेळांतही भाग घेतला पाहिजे. त्यातून तंदुरूस्ती वाढते व मनाला आनंद मिळतो. श्री दामोदर विद्यालयाने पहिल्यांदा कबड्डी स्पर्धा आयोजित करून ग्रामीण खेळाला योगदान दिल्याबद्दल मंथन आडपईकर यानी अभिनंदन केले. शिक्षण सल्लागार अनिल पै यांनी स्वागत केले व येत्यावर्षापासून मोठया प्रमाणात ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावेळी मॅनेजमेंट एक्झीक्युटीव रिमा कुंदे, प्राचार्य राजीव देसाई, मुख्याध्यापिका दत्ती कुंदे होत्या. शारीरिक शिक्षक राजन धामसेकर यंाच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली.