‘आकाश’कडून एकाचवेळी चार लक्ष्यांचा भेद

0
18

>> भारतीय हवाई दलाची दैदिप्यमान कामगिरी

भारतीय हवाई दलाने काल आणखी एक देदिप्यमान कामगिरी बजावताना हवाई दलाने आपल्या आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. या क्षेपणास्त्राने एकाच वेळी चार लक्ष्ये भेदण्यास यश मिळवले. संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशी क्षमता प्राप्त करणारा भारत हा पहिला देश बनला आहे, ज्यामुळे सिंगल फायरिंग युनिटच्या माध्यमातून रेंजवर कमांड गाईडेंसच्या माध्यमातून चार लक्ष्यांचा एकाच वेळी भेद करण्यात यश मिळवले.

संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, नुकत्याच पार पडलेल्या अस्त्रशक्ती 2023 च्या दरम्यान भारताने स्वदेशी आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या मारक क्षमता दाखवली. जिथे एकाच वेळी चार मानवरहित हवाई लक्ष्ये भेदण्यात आली. भारतीय हवाई दलाने 12 डिसेंबर रोजी सूर्यलंका एअर फोर्स स्टेशनवर अस्त्रशक्ती 2023 दरम्यान हे प्रात्यक्षिक आयोजित केले होते. स्वदेशी आकाश शस्त्र प्रणाली डीआरडीओने बनवली आहे. आकाश वेपन सिस्टीम ही एक स्वदेशी संरक्षण प्रणाली आहे. ही यंत्रणा खरेदी करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय ग्राहकांनी ऑर्डर केली आहे.

आकाश क्षेपणास्त्राबद्दल
आकाश ही भारत डायनॅमिक्स लिमिटेडकडून लहान श्रेणीची सरफेस टू एअर हवाई संरक्षण प्रणाली आहे. ही यंत्रणा शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून मोठ्या क्षेत्राचे संरक्षण करू शकते. आकाश एकाच वेळी अनेक लक्ष्यांना भेदू शकते. संपूर्ण शस्त्र यंत्रणा मोबाईल प्लॅटफॉर्मवर तैनात आहे. आकाश क्षेपणास्त्र प्रणाली हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने आणि यूएव्ही 4 ते 25 किमी अंतरावर उड्डाण करू शकते. हे लक्ष्य शोधण्यापासून ते मारण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अतिशय वेगाने पूर्ण करते. त्याची संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित आहे. ही यंत्रणा रेल्वे किंवा रस्त्याने वेगाने वाहून नेली जाऊ शकते.