मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात फेसबुकवर केलेल्या बदनामी प्रकरणी आपणाविरोधात केवळ आकसापोटी कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप या प्रकरणी अटक करून जामिनावर सुटका करण्यात आलेल्या केनेथ सिल्वेरा यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला.
पणजी पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघातून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. त्यामुळे सरकार पातळीवरून जमिनीपोटी मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम रोखून ठेवण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयाकडे माहिती हक्क कायद्याखाली मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यासंबंधी काही कागदपत्रांची मागणी करण्यात आल्याने आपल्या विरोधात संगनमताने तक्रार दाखल करण्यात आली आहे, असा दावा सिल्वेरा यांनी केला.