आंध्रप्रदेशमधील कडप्पा जिल्ह्यात शुक्रवारी अचानक आलेल्या पुरात आतापर्यंत किमान ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते आणि रहिवासी भागांत पाणीच पाणी दिसत आहे. चेरू या छोट्या नदीला अचानक आलेल्या पुरामुळे काठावरील काही गावांत पाणी घुसले. नंदालुरूजवळ तीन मृतदेह आढळून आले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे, यामुळे चित्तूर आणि कडपाह येथे अनेक वर्षांनंतर भीषण पूर आला आहे. तिरुपती आणि आंध्रपदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राज्यभर हाहाःकार उडाला आहे.