आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ जानेवारीपर्यंत स्थगित

0
19

ओमिक्रॉनच्या देशातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची वाहतूक ३१ जानेवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली असली तरी मालवाहू आणि डीजीसीए मान्यताप्राप्त उड्डाणांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.