एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर दिल्लीला जात असताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी हल्ला झाला होता. या प्रकरणी काल दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने त्यांना तात्काळ प्रभावाने सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ओवेसींनी ही सुरक्षा नाकारली आहे. मला मृत्यूची भीती वाटत नाही. मला झेड श्रेणीची सुरक्षा नकोय, मी ती नाकारतो. हल्लेखोरांवर यूएपीए कायद्यानुसार आरोप लावा. द्वेष, कट्टरतावाद संपवण्याचे आवाहन मी सरकारला करतो, असे ओवेसी यांनी काल संसदेत बोलून दाखवले.