शिवोली मतदारसंघाचे माजी आमदार तञा माजी मंत्री अशोक नाईक साळगावकर (81) यांचे काल सकाळी म्हापसा येथे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी दत्तवाडी येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अशोक नाईक साळगावकर हे 1984 व 1989 असे सलग दोन वेळा मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले होते.