अविश्‍वास ठरावावरील बैठक ३१ रोजीपर्यंत घ्या

0
84

राज्य सहकारी बँकेला हायकोर्टाचा आदेश
गोवा राज्य सहकारी बँकेचे चेअरमन उल्हास फळदेसाई यांच्यावरील अविश्‍वास ठरावासाठीची बैठक ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात यावी व केंद्रीय निबंधकांनी त्यासाठीच्या आपल्या प्रतिनिधीची एका आठवड्याच्या आत नियुक्ती करावी असा आदेश काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला.संजय सावंत देसाई यांनी यासंबंधीचा अर्ज खंडपीठापुढे दाखल केला होता. खंडपीठाने आपली पुढील सुनावणी आता ३ नोव्हेंबर रोजी मुक्रर केली आहे.
उल्हास फळदेसाई यांच्याविरुद्ध अविश्‍वासाचा ठराव आलेला असताना त्यावर चर्चेसाठी बैठक बोलावण्यात न आल्यामुळे संजय सावंत देसाई यांनी खंडपीठात अर्ज दाखल केला होता.