अविश्वास प्रस्तावावरून ‘इंडिया’मध्ये नाराजीनाट्य

0
2

भाजपविरोधातील विरोधकांच्या इंडिया आघाडीत अविश्वास प्रस्तावावरून नाराजीनाट्य झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेसने एकट्यानेच अविश्वास प्रस्ताव मांडल्यावरून ही नाराजी झाली. लोकसभेत काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी बुधवारी हा अविश्वास ठराव मांडला होता. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी याबाबत माफी मागितली असून, या प्रकरणाची दखल घेतली जाईल असे आश्वासन अन्य सहकारी पक्षांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच अशा प्रकराची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही, असेही आश्वासन दिले. समाजवादी पक्ष, टीएमसी, शिवसेना (ठाकरे गट), डावे आणि द्रमुक यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेसने एकट्याने नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित करत नाराजी व्यक्त केली.