अविश्‍वास ठरावाला सामोरे जा

0
10

>> पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा इम्रान खानना दणका

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाने उद्या ९ एप्रिल रोजी होणार्‍या अविश्वास ठरावाला सामोरे जाण्यास सांगितले असून या प्रकरणावर निर्णय देताना उपसभापती कासिम सुरी यांचा संसद बरखास्त करण्याचा निर्णय असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने अविश्वास प्रस्ताव ङ्गेटाळण्याचा उपसभापतींचा निर्णय रद्द करून तो घटनाबाह्य ठरवला आहे. दि. ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. दरम्यान, काल इम्रान खान यांचा अविश्वास प्रस्तावात पराभव झाला तर विरोधकांनी नवीन पंतप्रधान निवडावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोणत्याही सदस्याला मतदान करण्यापासून रोखले जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. या निर्णयानंतर विरोधकांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आम्ही निवडणुका घेण्यास तयार आहोत मात्र लवकर निवडणुका घेणे शक्य नसल्याचे सांगितले.

विरोधकांची बैठक
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी विरोधकांनी एक बैक बोलावली होती. या बैठकीला बिलावल भुट्टो, आसिङ्ग झरदारी आणि मौलाना ङ्गजलुर रहमान यांना निमंत्रण पाठवले होते. तसेच पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने ऑक्टोबर २०२२ मध्ये निवडणूक घेण्यास आयोग तयार असल्याचे म्हटले आहे.