अवघड जागी दुखणं…

0
84
  • डॉ.आरती दिनकर .
    (होमिओपॅथी तज्ज्ञ, समुपदेशक)

पुरुषांमध्ये नुसते बसून राहणे तसेच जड पदार्थांचे सेवन केल्यामुळे व ते न पचल्यामुळे मलबद्धता म्हणजेच रोज शौचास साफ न होणे, पोटात वात असणे यामुळे मूळव्याध झालेली दिसून येते.

अठ्ठेचाळीस वर्षाच्या शीलाताई माझ्याकडे मूळव्याधीसाठी होमिओपॅथीचे उपचार घेण्यासाठी आल्या. त्यांना बसता उठतानासुद्धा त्रास होत होता. शौचातून रक्त पडत होते. शौच कधीकधी खूप कठीण आणि आवयुक्त असायची. शौचाच्या जागी ठेचल्याप्रमाणे किंवा कापल्याप्रमाणे असह्य वेदना त्यांच्या गुद्द्वारात होतात अशी त्या तक्रार करत होत्या आणि मूळव्याधीचे कोंबही खूप मोठे होते. शीलाताई गृहिणी आहेत, त्यांना दोन मुले आहेत. घरातील कामाव्यतिरिक्त त्यांचा फारसा वावर बाहेर नसे किंवा त्यांचा व्यायाम होत नसे, वजनही जरा वाढलेले होते. त्यांचे याआधी एकदा मूळव्याधीचे ऑपरेशन झाले होते. परत त्यांना चार वर्षांनी हा मूळव्याधीचा त्रास होऊ लागला.

जेव्हा योग्य ती होमिओपॅथीची औषधे त्यांना दिली, दररोज जलद चालण्याचा व्यायाम करायला सांगितला. तिखट, तेलकट, हिरवी मिरची हेही कमी करण्यास सांगितले. काही दिवसातच त्यांच्या शौचाच्या वेळी होणार्‍या गुदद्वारातून होणार्‍या वेदना कमी झाल्या, संडासातून रक्त पडणे कमी झाले व हळूहळू मोड म्हणजेच कोंबही कमी होऊ लागले .

मुळव्याधीने म्हणजेच पाइल्सने ग्रस्त झालेले लोक खूप वैतागलेले असतात. त्यांना धड बसता येत नाही, उठताही येत नाही. ‘अवघड जागी दुखणं अन् जावई वैद्य’…अशी काहीशी स्थिती होऊन जाते. कारण मला मूळव्याध आहे असा आपण जवळच्या माणसांव्यतिरिक्त कुणाला सांगू शकत नाही. बरेचदा मूळव्याध बैठे काम करणार्‍या किंवा सतत बसून राहणार्‍या स्त्री-पुरुषांना झालेली दिसून येते. स्त्रियांना मुळव्याधी गर्भाशयाच्या दाबापासून होते व पुरुषांमध्ये आतड्याची क्रिया बंद झाल्यामुळे होते. स्त्रियांमध्ये कधीकधी गरोदरपणी गुदद्वाराच्या सभोवती मूळव्याधी झुपका जमतो तो योग्य औषधांशिवाय कमी होत नाही. डोक्यातून रक्त वाहिले तर कुणाकुणाला बरे वाटते.

बर्‍याच स्त्रियांना बाळंतपण झाल्यानंतर मूळव्याध झाल्याचे लक्षात येते परंतु मूळव्याधीची सुरुवात स्त्रियांमध्ये पाचव्या-सहाव्या महिन्यात होऊ लागते. पूर्ण मास होण्याच्या सुमारास मूळव्याधीची संस्था व आकृती वाढत.े मूळव्याधीचा झुपका बहुतेकदा द्राक्षाच्या घडाप्रमाणे वाढलेला आढळून येतो. मूळव्याधीचे कोंब ३-७-११ या घड्याळात वाजण्याच्या स्थानाप्रमाणे असतात. कधी कधी जास्त हालचाल किंवा जास्त श्रमाने मूळव्याधीचा रक्तस्त्राव वाढतो.
पुरुषांमध्ये नुसते बसून राहणे तसेच जड पदार्थांचे सेवन केल्यामुळे व ते न पचल्यामुळे मलबद्धता म्हणजेच रोज शौचास साफ न होणे, पोटात वात असणे यामुळे मूळव्याध झालेली दिसून येते. अनेकदा बरेचसे रुग्ण मूळव्याधीचे ऑपरेशन करून येतात पण काही दिवसांनी किंवा वर्षांनी परत त्याला मूळव्याधीचे कोंब दिसू लागतात आणि मूळव्याधीचा असह्य त्रास होऊ लागतो. अशावेळी होमिओपॅथिक औषधे दिली तर ते ठणठणीत बरे होतात. यासाठीच होमिओपॅथीची औषधे रोग्याला काहीही त्रास न होता आणि ऑपरेशन न करता कायमचा गुण देणारी अशी अत्यंत प्रभावी औषधे आहेत.