अवकाळी पावसाची हजेरी; हवेत गारवा

0
28

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, काल रात्री राज्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस कोसळला.

हवामान खात्याने सोमवार व मंगळवारी राज्यात अवकाळी पाऊस कोसळेल, अशी शक्यता वर्तवली होती. काल सकाळपासूनच राज्यात दमट वातावरण होते. तसेच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे दिवसभरात पाऊस पडेल अशी शक्यता निर्माण झाली होती. सायंकाळी ७ नंतर राज्याच्या काही भागांत, तर रात्री ९ च्या सुमारास राजधानी पणजीत जोरदार अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे नागरिकांची थोडी धांदल उडाली. विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होत असल्याने पावसाळी वातावरण तयार झाले होते. अवकाळी पाऊस जोरदार बरसल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.