तिस्क-उसगांव येथील एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला जबरदस्तीने आणून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून राजू राम, राजा राम व अरविंद राम (राहणार उत्तर प्रदेश) या तिघांना फोंडा पोलिसांनी संशयीत आरोपी म्हणून काल संध्याकाळी अटक केली. हे तिघेही कपिलेश्वरी येथे राहत असून तिथेच ती मुलगी आढळून आली. तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.