18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पत्नीशी शारीरिक संबंध हा बलात्कार समजला जाईल. त्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हाही नोंदवला जाऊ शकतो, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काल स्पष्ट केले. अल्पवयीन पत्नीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची 10 वर्षांची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली. अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीने शारीरिक संबंध ठेवणे कायद्यानुसार बलात्कार मानले जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. अपीलकर्त्याला 2019 मध्ये ट्रायल कोर्टाने पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवले होते. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते.