अल्पवयीन चालकांना दणका; ११ दुचाकी पोलिसांकडून जप्त

0
13

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाईचा इशारा बुधवारी दिल्यानंतर उत्तर गोव्यातील म्हापसा विभागातील म्हापसा, कोलवाळ आणि हणजूण पोलिसांनी अल्पवयीन दुचाकीचालकांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली.

काल या कारवाईत ११ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.
या प्रकरणी अल्पवयीन मुलांचे पालक आणि दुचाकीमालकांना पोलीस स्थानकात बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. अल्पवयीन मुलांना समज देण्यात आली असून, मोटर वाहन कायद्यानुसार दंड ठोठावण्यात आला, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.

दरम्यान, खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहने पर्यटकांना भाड्याने देणार्‍यांविरोधात कारवाई करावी, या राज्य सरकारच्या निर्देशानंतर कळंगुट पोलिसांनी भाड्याने दिलेली दोन खासगी वाहने जप्त केली. काल पोलिसांनी एक खासगी दुचाकी व एक चारचाकी जप्त केली.