आपल्या घरातील अल्पवयीन मोलकरीणीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली काल येथील बाल न्यायालयाने गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील एक डॉक्टर झेलियो डिमेलो व त्याची पत्नी एलिन डिमेलो यांना तीन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा तसेच एक लाख रु.चा दंड ठोठावला. एक लाख रु.चा दंड न भरल्यास त्यांना आणखी एका वर्षाची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, आरोपीना या आदेशाला वरील न्यायालयात आव्हान देण्यासाठी न्यायालयाने त्यांना १४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. आपल्या अल्पवयीन मोलकरीणीवर शारिरीक अत्याचार करीत असल्याच्या आरोपाखाली झेलियो डिमेलो व एलिन डिमेलो यांच्यावर बाल न्यायालयात खटला गुदरण्यात आला होता.