अल्जियर्सला निघालेले विमान नदीत कोसळले

0
123

११६ जण मरण पावल्याची भीती

एअर अल्जिरी कंपनीचे प्रवासी विमान काल आफ्रिकेतील नायगर नदीत कोसळल्यामुळे त्यातील एकूण ११६ जण बुडून मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बुर्किना फासोजची राजधानी औगाडौगू येथून वरील दुर्दैवी विमानाने उड्डाण केल्यानंतर ५० मिनिटांनी या विमानाचा रडार यंत्रणेशी असलेला संपर्क तुटला होता. अल्जियर्सला निघालेले सदर विमान वादळी हवा असलेल्या भागातून मार्गक्रमण करत होते.