राज्याचा आगामी २०२० – २१ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्प सादरीकरणाची तारीख गोवा विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या २८ जानेवारी २०२० रोजी होणार्या बैठकीत निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू आहे.
अर्थसंकल्प सादरीकरणाची तारीख निश्चित झालेली नाही. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पाचा विषय मांडला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्य सरकार राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू होण्याबाबत सकारात्मक आहे.