अर्थसंकल्प अधिवेशन काळात जमावबंदी लागू

0
31

उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी 2 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सत्र काळात पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पाच्या सभोवतालच्या 500 मीटर भागात आणि पणजी पोलीस स्थानकाच्या क्षेत्रातील कोणत्याही सार्वजनिक भागात पाच किंवा जास्त व्यक्ती जमा होण्यास आणि मिरवणूक काढण्यास किंवा आयोजित करण्यास, पिस्तुले किंवा लाठी, तलवारी, भाले किंवा सुरा यासारखी शस्त्रे जवळ बाळगण्यास, ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास, घोषणा देण्यास आणि फटाके फोडण्यास बंदी लागू केली आहे. लग्नसोहळे, अंत्यविधी, खास प्रसंग यासाठी ज्यांनी पूर्व लेखी परवानगी घेतली आहे, त्यांना ही बंदी लागू नाही.