निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम राज्यातील मतमोजणीची तारीख बदलली आहे. या दोन्ही राज्यांतील लोकसभा आणि विधानसभा मतमोजणी तारीख आता 2 जून रोजी होणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम लोकसभा आणि विधानसभेचा निकाल आधी 4 जून रोजी लागणार होता. मात्र, आता ही तारीख बदलून 2 जून करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या दोन राज्यांच्या निकालाची तारीख बदलली असून त्याचे कारणही स्पष्ट केले आहे. अरुणाचल प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान पार पडणार आहे.
अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ 2 जूनला संपणार आहे. यामुळे मतमोजणी 2 जूनपर्यंत पूर्ण होणे गरजेचे आहे. यामुळे निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन्ही राज्यांत निवडणुकीच्या निकालाच्या तारखा बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता या दोन राज्यांची मतमोजणी 2 जून रोजी होणार आहे.