अयोध्येत रामंदिराच्या शिखर उभारणीस प्रारंभ

0
7

>> 120 दिवसांत काम पूर्ण, मंदिराची उंची 161 फूट होणार

राम मंदिराच्या शिखराच्या उभारणीला काल घटस्थापनेच्या मुुहुतावर सुरुवात झाली. ते 120 दिवसांत तयार होईल. यानंतर मंदिराची एकूण उंची 161 फूट होईल. शीर्षस्थानी धर्मध्वज असेल.

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी याबाबत माहिती देताना, बांधकाम सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी पूजा करण्यात आली. शिखरावरील मुख्य दगडाचे पूजन करण्यात आले. बांधकामाचा वेग चांगला आहे. कामे वेळेत पूर्ण होतील. अभियंत्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या असल्याची माहिती दिली.
त्याची रचना सोमपुरा आर्किटेक्ट्सने केली आहे. ट्रस्टने याआधीच डिझाइन फायनल केले होते. संपूर्ण मंदिराची उंची (शिखरापर्यंत) 161 फूट आहे. शिखर बांधण्यासाठी किमान 120 दिवस लागतील असे ते पुढे म्हणाले. शिखरावर धर्मध्वजही असेल. मंदिरात शिखर बनवणे सर्वात कठीण मानले जाते. त्यामुळेच त्याचे बांधकाम सुरू झाले तेव्हा सर्व यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

4 महिन्यांत 7 ऋषी-संतांची मंदिरे बांधली जातील असे सांगून नृपेंद्र मिश्रा यांनी, मी राम मंदिर संकुलात तयार होत असलेल्या सप्तमंदिराची पाहणी केली. वशिष्ठ, कश्यप, अत्री, जमदग्नी, गौतम, विश्वामित्र, भारद्वाज या सात ऋषींच्या नावावरून या मंदिरांची नावे आहेत. प्रत्येकाच्या मूर्ती येथे बसवल्या जातील. त्याच्या बांधकामात वेगवान गती होती अशी माहिती दिली. याशिवाय मंदिरात भगवान राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्यासह 24 देवतांच्या मूर्तींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ते लवकरच स्थापित केले जाणार असून राम मंदिराच्या उभारणीला गती देण्यासाठी तीन दिवसीय आढावा बैठक घेतली जात असल्याचे ते म्हणाले.

1500 कामगार
या ठिकाणी सध्या 1500 कामगार कार्यरत असून ते राजस्थान, गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेशातील आहेत. डिसेंबर 2024 पर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी मंदिर निर्माण कंपनीने आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामगारांची नियुक्ती करून रात्रंदिवस काम केले जाणार आहे.