अयोध्येतील राम मंदिराचे पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे निधन

0
3

अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजारी आचार्य महंत सत्येंद्र दास (85) यांचे काल बुधवारी निधन झाले. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. झटका आल्यामुळे त्यांना 3 फेब्रुवारी रोजी सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर त्यांना लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमधील रुग्णालयात येऊन त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेतली होती. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिदीचा ढाचा कोसळण्याच्या आधीपासून आचार्य सत्येंद्र दास राम मंदिरात पुजारी म्हणून काम करत होते. नऊ महिन्यांपूर्वी जेव्हा राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले, तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा पदाचा ताबा घेतला होता.