अमेरिकेत कोरोना लशीकरणास प्रारंभ

0
237

अमेरिकेत कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले असून लशीचा पहिला डोस न्यूयॉर्कमधील परिचारिका सँड्रा लिंडसे यांना देण्यात आला. कोरोना लशीकरणाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या बद्दल आनंद व्यक्त केला.

कोरोनाने मागील आठवड्यातील बुधवारी अमेरिकेत विक्रमी ३,२६३ रुग्णांचा बळी घेतला. त्यामुळे आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता फायझर आणि बायोएनटेकच्या कोविड-१९ लशीला आणीबाणीच्या काळातील वापरासाठी हिरवा झेंडा दाखण्यात आला. अमेरिकेच्या ‘एफडीए’च्या अंतर्गत येणार्‍या लस व संबंधित जैविक उत्पादन सल्लागार समितीने आठ तासांच्या बैठकीत लस आणीबाणीच्या स्थितीत वापरण्याची शिफारस ‘एफडीए’ला करण्याचा निर्णय मतदानाद्वारे घेतला. ही लस १६ वर्षावरील व्यक्तींना देण्यात येणार आहे.